Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

खळदच्या महाआरोग्य शिबिरात अवयवदाते कुटुंबाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

बारामती : पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खळद येथे आयोजित महाआरोग्य शिबिरात अवयवदाते सुबनावळ कुटुंबीयांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मागील वर्षी इंदापूर तालुक्यातील कै. हिराबाई सुबनावळ यांचे ब्रेनडेड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र कैलास सुबनावळ यांनी अवयवदानासाठी सहमती दर्शविली. त्यांच्या या धाडसी आणि मानवतावादी निर्णयामुळे तब्बल पाच जणांना जीवनदान मिळाले.

हेही वाचा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन

यावेळी कैलास सुबनावळ यांनी, “जळून राख होण्यापेक्षा आईला अवयवदानरूपी जिवंत ठेवले,”अशी भावना व्यक्त केली. इंदापूर तालुक्यातील एका छोट्या गावातील कुटुंबाने घेतलेला हा सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी निर्णय समाजासाठी आदर्श ठरत आहे. या शिबिरात तब्बल ८ हजार ८८० लाभार्थींनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला. शिबिराततपासणीदरम्यान सुमारे २ हजार रुग्णांमध्ये विविध आजारांचे निदान झाले. या रुग्णांवर पुढील पंधरवड्यापासून महिनाभराच्या कालावधीत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत नियोजन करण्यात आले आहे.

या महाआरोग्य शिबिरात अवयवदानाबाबत जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी अवयवदानाचे महत्त्व, त्यातून मिळणारे जीवनदान आणि समाजातील गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे महादेव मगर (संपर्क ९८५०५१२२२३) यांनी कळविली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button