Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

“बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनतोय, भारताच्या सुरक्षेला मोठा धोका”; शेख हसीना यांच्या सुपुत्राचा मोठा दावा

Sheikh Hasina Son Sajeeb Wazed Joy Statement | “बांगलादेश हा आता एक अपयशी देश बनत चालला असून तो दुसरा पाकिस्तान होण्याच्या मार्गावर आहे”, असा खळबळजनक दावा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सुपुत्र आणि अवामी लीगचे वरिष्ठ नेते साजीब वाजेद जॉय यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने हस्तक्षेप केला नाही, तर बांगलादेश या क्षेत्रातील दहशतवादाचे सर्वात मोठे केंद्र बनेल आणि जगातील पुढचे अतिरेकी बांगलादेशमधून तयार होतील, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.

नवी दिल्लीतील ‘फॉरेन करस्पाँडंट्स क्लब ऑफ साउथ एशिया’ने आयोजित केलेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात शेख हसीना आणि साजीब वाजेद जॉय यांनी सहभाग घेतला होता. सत्ता उलथवल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी भारतातून पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या संवाद साधला असून, यावर्षी डिसेंबर महिन्यात त्या बांगलादेशात परतण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या मॅरीलँड येथून बोलताना जॉय यांनी बांगलादेशातील सध्याच्या अराजक परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

हेही वाचा

‘भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारणीला गती; रत्नागिरीच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी दिशा’; मंत्री नितेश राणे

२०२४ मध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले असल्याचे जॉय यांनी सांगितले. “पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) सध्या बांगलादेशात सक्रियपणे काम करत आहे. अवामी लीग सरकारच्या काळात अटक केलेल्या शेकडो अतिरेक्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. भारताच्या पूर्वेकडील सीमेला लागून असलेल्या बांगलादेशातील ही परिस्थिती भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत भारतीय माध्यमांनी यावर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

युनूस राजवटीवर आणि निवडणुकीवर कडक टीका

मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम राजवटीत बांगलादेशची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून देश अराजकतेकडे ढकलला गेल्याचे जॉय यांनी म्हटले. अवामी लीग पक्षावर बंदी घालून घेतलेल्या निवडणुकांवर त्यांनी आक्षेप घेतला. तसेच, जुलै २०२४ मधील आंदोलनातील मृतांच्या आकड्यावर प्रश्न उपस्थित करत, संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार १४०० लोक मारले गेले असताना सरकारने केवळ ८०० आकडा दाखवून उर्वरित ६०० मृतांची माहिती दडपल्याचा आरोप त्यांनी केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button