Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यातील चिकित्सा आस्थापनांची नोंदणी, विनियमन व तपासणीसाठी मानकांबाबत विधेयकाच्या अनुषंगाने नागरिकांकडून सूचना मागवल्या

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील चिकित्सा आस्थापनांची नोंदणी, विनियमन व तपासणीसाठी मानकांबाबत विधेयका च्या अनुषंगाने सूचना, सुधारणा पाठवू इच्छिणाऱ्या नागरिक व संबंधितांनी आपल्या सूचना, सुधारणा तीन प्रतींमध्ये गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय येथे पाठवाव्यात असे विधान मंडळाचे जितेंद्र भोळे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र विधानसभा २०२६ चे विधेयक क्रमांक ५१ – “महाराष्ट्र राज्यातील चिकित्सा आस्थापनांची नोंदणी, विनियमन व तपासणी करण्यासाठी, अशा आस्थापनांद्वारे ज्या सुविधा व सेवा पुरविण्यात येतील त्यांची किमान मानके विहित करण्याकरिता; आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्यासाठी विधेयक “असे त्याचे पूर्ण नाव असून सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे हे विधेयक विचारार्थ पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा –  ‘महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर’; मंत्री आदिती तटकरे

विधेयकातील तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील जनता तसेच संबंधित विषय क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था, संघटना, NGOs यांचेकडून सूचना, सुधारणा मागविण्याचा निर्णय समितीने २९ जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे. सूचना, सुधारणा पाठवू इच्छिणाऱ्या नागरिक व संबंधितांनी आपल्या सूचना, सुधारणा तीन प्रतींमध्ये गुरुवार, दिनांक २० ऑगस्ट, २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने निम्नस्वाक्षरीत श्री. जितेंद्र भोळे, सचिव-१, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई-४०००३२ यांच्याकडे “सर्वसाधारण” व “खंडनिहाय” या स्वरुपात पाठवाव्यात. अथवा महाराष्ट्र विधानमंडळाच्या “www.mls.org.in” या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या https://mahalegislature.org.in/assembly-bill-51/ या लिंकवर देण्यात आलेल्या गुगल फॉर्म (Google Form) द्वारे युनिकोड फॉन्ट (Unicode Font) मध्ये पाठवता येतील.

या विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रती शासकीय ग्रंथागार पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर तसेच व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड, मुंबई-४००००४ यांचेकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.तसेच सदरहू विधेयक (मराठी /इंग्रजी) महाराष्ट्र विधानमंडळाच्या उपरोक्त संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे असे सचिव, विधानमंडळ सचिवालय यांनी कळविले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button