ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावेत येथील सिल्वर गार्डनीया सोसायटीत रक्तदान शिबीर उत्साहात

६८ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग, सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या सामाजिक भावनेतून रावेत येथील सिल्वर गार्डनीया सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमात तब्बल ६८ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश दिला.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोसायटीचे चेअरमन विक्रांत साळुंखे आणि सेक्रेटरी चेतन इंगळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी खजिनदार सचिन पाटील, व्यवस्थापक आर. जे. पगारे, सदस्य तेजस्विता काजळे, अरुणा सीलम, सुजाता पाटील, आयुष पाटील, दिनेश लिंगवत तसेच सोसायटीतील अनेक मान्यवर आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिराचे संपूर्ण नियोजन सोसायटीचे व्यवस्थापक आर. जे. पगारे यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले. रक्तदाते, स्वयंसेवक आणि आयोजक यांच्यात उत्तम समन्वय साधत संपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, नोंदणी, तपासणी आणि रक्तसंकलनाची व्यवस्था सुयोग्य पद्धतीने करण्यात आली होती.

हेही वाचा –  माता, पिता व गुरुजनांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करा – हर्षवर्धन पाटील 

यावेळी सोसायटी प्रशासनाने भविष्यातही आरोग्य, सामाजिक जनजागृती आणि लोकहिताशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. रहिवाशांनीही अशा समाजोपयोगी उपक्रमांना नेहमीप्रमाणेच सक्रिय सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

‘दिनेश ॲडव्हर्टायझिंग’ यांचे विशेष सहकार्य

या सामाजिक उपक्रमाला ‘दिनेश ॲडव्हर्टायझिंग’ यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे रक्तदान शिबिराचे नियोजन अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाविषयी जनजागृती होण्यास आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group