Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’ पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन

Share On

सांगली : जिल्हा माहिती कार्यालय, सांगली यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिका तसेच पत्रकारांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या ‘पत्रकार संवादिका’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध’; डॉ.राजेश गवांदे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पत्रकारांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या तरी अनेकदा आवश्यक माहिती किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे पात्र पत्रकारांना त्यांचा लाभ घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेली ही पुस्तिका पत्रकारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारी घडीपत्रिका नागरिकांना त्या विभागाच्या विविध योजनांची माहिती समजण्यास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले.

पत्रकार संवादिकेत पत्रकारांसाठी शासन राबवत असलेल्या प्रमुख योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली असून, प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहितीही स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या प्रमुख योजनांची माहिती घडीपत्रिकेत देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन होण्यास मदत होईल. कोल्हापूर विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून ही पुस्तिका तयार करण्यात आली असून, त्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) व अनुसूचित जाती उपयोजना यांच्या निधीतून पुस्तिका व घडीपत्रिका तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी घडीपत्रिका तसेच, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी पत्रकार संवादिका पुस्तिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत, पत्रकार कल्याणासाठी ही पुस्तिका प्रभावी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button