Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

इराणविरोधातील युद्धात आखाती देश लक्ष्य! गेल्या ४८ तासांत मोदींनी साधला ८ देशांशी संपर्क

PM Modi Gulf Countries News contact 8 nations : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू ठेवले आहेत. गेल्या चार दिवसांपासून जगात युद्धसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही प्रतिहल्ले सुरू ठेवले असून आखाती देशांना लक्ष्य केलं आहे. परिणामी अमेरिका, इस्रायल, इराण आणि आखाती देशांत राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४८ तासांत आठ देशांशी संपर्क साधला असून भारतीयांची सुरक्षिताता सुनिश्चित केली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतारच्या प्रमुखांशी संपर्क साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी कतारवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसंच, कतारमधील भारतीय समुदायाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

“माझे भाऊ, कतारचे अमीर, एचएच शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी मी बोललो. आम्ही कतारच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केल्याचा तीव्र निषेध करतो. आम्ही संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीच्या या प्रदेशात शांतता आणि स्थिरता येण्याची गरज आहे, यावर चर्चा केली. या आव्हानात्मक काळात कतारमधील भारतीय समुदायाला त्यांनी दिलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि काळजीबद्दल मी त्यांचे कौतुकही केले आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा –  गिग कामगारांसाठी स्वतंत्र कायदा नाहीच, राज्य सरकार स्थापन करणार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दुपारी आखाती प्रदेशातील दोन महत्त्वाच्या नेत्यांशीही चर्चा केली. त्यांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आणि कुवेतचे क्राउन प्रिन्स सबा अल खालेद अल हमद अल मुबारक अल सबा यांच्याशीही संवाद साधला.

“महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी चर्चा केली आणि पश्चिम आशियातील अलिकडच्या घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. ओमानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन झाल्याचा निषेध केला. प्रादेशिक शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचित करण्यासाठी शाश्वत राजनैतिक सहभाग आवश्यक आहे यावर आम्ही सहमत झालो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काल पंतप्रधान मोदींनी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय यांना संपर्क केला होता आणि जॉर्डनच्या लोकांच्या शांतता आणि सुरक्षा कल्याणासाठी भारताचा पाठिंबा असल्याचं म्हटलंय. तर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद आणि बहरीनचे राजा हमद बिन इसा अल खलिफा यांच्याशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवरून संवाद साधला. या चर्चेत पंतप्रधानांनी सौदी अरेबिया आणि बहरीन या दोन्ही देशांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. त्यांनी या देशांमध्ये राहणाऱ्या मोठ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल आणि कल्याणाबद्दल विचारपूस केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button