Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर धावत्या कंटेनरला भीषण आग, चालकाच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ…

Share On

लोणावळा : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहनांना आग लागण्याचे सत्र थांब नाव घेईनासे झाले आहे. आज पुणे लेनवर कुणे गावच्या हद्दीत एका धावत्या मालवाहू कंटेनरच्या केबिनला अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहन तातडीने रस्त्याच्या कडेला घेतले आणि बाहेर उडी मारली, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

मात्र, या आगीत कंटेनरचे केबिन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि ‘आयआरबी’च्या (IRB) देवदूत रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

हेही वाचा –  नागपुरातील कोराडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण

एक्सप्रेसवेवर वारंवार घडणाऱ्या अशा अग्नितांडवामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वाहनांच्या तांत्रिक देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत आग विझवण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button