पाकिस्तान जे सांगतं ते राहुल गांधी खरं मानतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

ठाणे : देशात विदेशात जाऊन राहुल गांधी हे आपल्या देशाची बदनामी करतात आणि पाकिस्तान जे सांगत ते खरं मानतात. एक तासात आपण युद्ध हरलो होतो, यामध्ये त्यांना आनंद वाटतो. ही कसली देशभक्ती आहे, हा तर देशद्रोह आणि देशाची बेईमानी आहे. त्यांच पाकिस्तानच प्रेम उतू चालले असून देशातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
देशात २०१४ पूर्वी टूजी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ, कोळसा, चारा असे असंख्य घोटाळे झाले. २०१४ नंतर एक तरी घोटाळा झाला का दाखवा. यामुळेच बेडाग पंतप्रधानांना बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी आहे, असेही शिंदे म्हणाले. जेवढे मोदींवर आरोप कराल तेवढी या देशातली जनता त्यांच्या सोबत राहणार आहे, अशी टिकाही त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केली.
हेही वाचा – कोणीही एकत्र आले तरी, आम्ही जिंकणार; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
देशात विदेशात जाऊन राहुल गांधी हे आपल्या देशाची बदनामी करतात आणि पाकिस्तान जे सांगत ते खरं मानतात एका तास आपण युद्ध हरलो होतो, याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. ही कसली देशभक्ती आहे. हा तर देशद्रोह आहे आणि देशाची बेईमानी आहे. त्यांचे पाकिस्तानच प्रेम त्यांच उतू चालले आहे. यामुळे देशातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय नाही, असा टोला त्यांनी लगावला. सगळीकडे मतदान शांततेत होत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकींमध्ये महायुतीने विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.




