Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विकासाच्या अजेंड्यावर निवडणुकीला सामोरे जाणार; निशा यादव

प्रभाग क्रमांक ११ मधून निशा दिनेश यादव यांना नागरिकांचा प्रचंड पाठिंबा

नागरिकांशी संवाद साधत चिखली कृष्णा नगरमध्ये ‘घर टू घर’ प्रचार

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

चिखली, कृष्णानगर परिसरात भारतीय जनता पार्टीच्या निशा दिनेश यादव यांनी घर–घर संपर्क मोहीम राबवली. भाजपाच्या विकासाच्या अजेंड्यावर महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहोत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासातून आमदार महेश लांडगे यांच्या स्वप्नातील परिपूर्ण शहर घडवायचे आहे असे देखील निशा यादव यावेळी म्हणाल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी निशा यादव या प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी नागरिकांनी पर्यंत जाऊन त्यांना पक्षाची ध्येय धोरणे, विकासाचा अजेंडा त्या नागरिकांच्या समोर ठेवत आहेत.भाजपच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट झाला आहे. त्यामुळे भाजपला नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी निशा यादव म्हणाल्या.

हेही वाचा        :          सोसायटी फेडरेशनतर्फे भव्य सर्वरोग महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसादाची अपेक्षा

दरम्यान या प्रचार मोहिमेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.घर टू घर प्रचारादरम्यान निशा यादव यांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत भाजपच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली. नागरिकांनीही विकासाच्या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना पाठिंबा दर्शविला.

यावेळी बोलताना निशा दिनेश यादव म्हणाल्या की, “आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून विकसित होत असलेल्या शहराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निरंतर आणि स्वच्छ पाणीपुरवठा, उच्च दर्जाचे सुरक्षित व रुंद रस्ते, नवे उपक्रम आणि सर्वांगीण विकासकामांची गती कायम ठेवून प्रभागाचा विकास सातत्याने पुढे नेणार आहोत.”

प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवणे, नागरिकांच्या समस्या मनापासून ऐकून त्यावर उपाययोजना करणे हेच आपले ध्येय आहे. भाजपच्या विकासाच्या धोरणाला नागरिकांनी दर्शविलेला पाठिंबा हीच आपली शक्ती आहे.

– निशा दिनेश यादव

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button