Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीएमपीएल बसने सख्ख्या बहिणींना चिरडले; नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

पिंपरी | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) भरधाव बसने रस्ता ओलांडणार्‍या दोन सख्ख्या बहिणींना चिरडल्याची घटना मंगळवारी तळवडे येथील ज्योतिबानगर येथे घडली. यामध्ये नऊ वर्षीय बहिणीचा मृत्यू झाला, तर तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाली.

सुधा बिहारीलाल वर्मा (वय ९, रा. ज्योतिबानगर, तळवडे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तिची बहीण राधा राम वर्मा (वय २५, दोघी रा. साई उद्यानाजवळ, तळवडे) ही गंभीर जखमी झाली आहे. देहूरोड पोलिसांनी बस चालक किरण भटू पाटील (वय ३५, रा. टॉवर लाईन, चिखली) याला अटक केली आहे.

हेही वाचा      :          इथेनॉल मॅन आणि उद्योजक डॉ प्रमोद चौधरी मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

देहूरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा ही गरोदर असल्याने तिच्या बाळंतपणासाठी छोट्या बहिणीला गावाहून बोलावले होते. राधा ही पतीसह तळवडे येथील एका वर्कशॉपमध्ये काम करत होती. जेवण करून दोघी परत जात असताना रस्ता ओलांडताना तळवडेकडून निगडीच्या दिशेने येणार्‍या पीएमपीएल बसने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये सुधा हिचा मृत्यू झाला, तर राधा गंभीर जखमी झाली. तिला पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पीएमपीएल बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि बस चालकाला ताब्यात घेतले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button