Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri-Chinchwad: काळेवाडी फाटा भूखंड वापर प्रकरणात आंदोलन तात्पुरते स्थगित

PMRDAच्या निर्णयाविरोधात उभारलेला आवाज; CM सोबत चर्चेनंतर पुढील दिशा

पिंपरी-चिंचवड: वाकड, कस्पटे वस्ती परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक उपयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा काळेवाडी फाटा (पेठ क्र. 38-39, सर्व्हे नं. 208-209) येथील उद्यान, खेळाचे मैदान, विरंगुळा केंद्र म्हणून राखीव भूखंड PMRDA प्रशासनाने व्यावसायिक वापरासाठी देण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. या निर्णयाच्या निषेधार्थ धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणात आमदार शंकरभाऊ जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार नागरिक प्रतिनिधींनी प्रस्तावित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिकांच्या मते, हा भूखंड परिसरातील नागरिकांच्या मनोरंजन, क्रीडा आणि सार्वजनिक सोयी-सुविधांसाठी अत्यंत आवश्यक असून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय अनुचित आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेत या विषयावर तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असून या संपूर्ण प्रक्रियेवर नागरिकांचे लक्ष लागले आहे.

“काळेवाडी फाटा परिसरातील हा भूखंड हा नागरिकांच्या हक्काचा आहे. उद्यान, खेळाचे मैदान आणि विरंगुळा केंद्र ही येथील प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज आहे. PMRDA ने तो व्यावसायिक वापरासाठी देण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. आम्ही नागरिकांच्या हितासाठीच आंदोलनाची हाक दिली होती. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. चर्चेतून जनहिताचा सकारात्मक निर्णय होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

संदीप कस्पटे, माजी नगरसेवक, भाजपा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button