Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसला मत म्हणजे मुस्लिमांना मत; नवनीत राणांचं वक्तव्य

Navneet Rana | मेळघाट येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी काँग्रेस आणि मुस्लिम समाजाबाबत केलेल्या विधानावरून टीकेची झोड उठली आहे. आपल्या देशात काँग्रेस म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजे काँग्रेस अशी स्थिती आहे. त्यामुळे आपलं एक जरी मत काँग्रेसला गेलं तर ते मत मुस्लिमांना गेलं असा अर्थ होतो, असं नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा      :            बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन; 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेस म्हणजे मुस्लीम आणि मुस्लीम म्हणजेच काँग्रेस. मेळघाटात काँग्रेसचे झेंडे वाटल्याचं ऐकलं. हे काँग्रेसचे झेंडे कोणाला दिले असतील? मुस्लिमांना काँग्रेसचे झेंडे दिले गेले. त्या लोकांनी तशी घोषणाच केली आहे. त्यामुळे आपलं एक जरी मत काँग्रेसला जाणं म्हणजे आपलं मत मुस्लिमांना जाणार, असंही नवनीत राणा म्हणाल्या.

दरम्यान, नवनीत राणा यांच्या या विधानावर काँग्रेससह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी टीका केली असून, निवडणूक काळात अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या मुद्द्यावरून मेळघाटातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button