Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निवेदनांचा स्वीकार

नागपूर : रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना भेटून त्यांची निवेदने स्वीकारली. त्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात आश्वस्त केले.

रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकास भेटून त्यांची निवेदने स्विकारली. नागरिकांनी आपल्या वैयक्तिक अडचणी तसेच आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे असलेले प्रलंबित प्रश्न, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, अनुकंपा नोकरी आदी प्रश्नाबाबत निवेदने सादर केले. प्रत्येक नागरिकांना त्यांच्या तक्रारीसंदर्भात अश्वस्त केले.

हेही वाचा –  ‘…तर मी राहुल गांधींना १००० रूपये बक्षीस देणार’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना सहाय्य व्हावे, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नागरिकांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना धनादेश दिला. निवेदने सादर करणाऱ्यांमध्ये विविध संस्था व लोकप्रतिनिधींचा समावेश होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button