Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदर्शवत उपक्रम: इमॅजिका पार्क सोसायटीने सौर ऊर्जा क्रांतीचा घेतला पुढाकार !

संजीवन सांगळे : विजेचे बिल शून्यावर, पर्यावरण रक्षणात मोलाची भर!

पिंपरी-चिंचवड : इमॅजिका पार्क सहकारी गृह रचना संस्थेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत ४० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प स्वखर्चाने यशस्वीपणे उभारला आहे. या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे उद्घाटन सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. संजीवन सांगळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

या प्रकल्पामुळे सोसायटी विजेसाठी पूर्णतः स्वावलंबी झाली असून, पूर्वी येणारे भरमसाठ वीजबिल आता शून्यावर आले आहे. विशेष म्हणजे, सौर प्रकल्पातून निर्माण होणारी अतिरिक्त वीज महावितरणकडून खरेदी केली जाणार आहे, ज्यामुळे सोसायटीला आर्थिक लाभही मिळणार आहे.

हेही वाचा –  ‘भारतरत्न’ सन्मानित व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

उद्घाटन प्रसंगी सोसायटीचे चेअरमन श्री. प्रशांत निखाडे, सर्व कमिटी सदस्य आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. हा प्रकल्प पूर्णत्वास नेल्यामुळे सोसायटीमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, “इमॅजिका पार्क सोसायटीने जो सौर ऊर्जा प्रकल्प राबवला आहे, त्यातून निसर्गाची स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जा मिळणार आहे. यामुळे केवळ विजेची बचत होणार नाही, तर पर्यावरण रक्षणातही मोठा वाटा उचलला जाईल. शहरातील इतर सोसायट्यांनीही हा आदर्श घेऊन सौर प्रकल्प बसवावेत आणि भविष्यासाठी सुरक्षित पाऊल उचलावे.” हा प्रकल्प केवळ ऊर्जा निर्मितीपुरता मर्यादित नसून, हरित जीवनशैलीचा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. पिंपरी चिंचवडमधील इतर सोसायट्यांसाठी ही एक सकारात्मक चळवळ सुरू होण्याची नांदी म्हणावी लागेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“इमॅजिका पार्क सोसायटीने स्वखर्चाने बसवलेला ४० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प हा केवळ विजेची बचत करणारा नव्हे, तर पर्यावरण रक्षणासाठीही एक मोलाचा उपक्रम आहे. प्रत्येक सोसायटीने अशा प्रकारे सौर ऊर्जा प्रकल्प राबवून आपल्या परिसराला स्वच्छ आणि हरित ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे केवळ विजेवरचा आर्थिक भार कमी होणार नाही तर आपण निसर्गाच्या संवर्धनासाठीही हातभार लावू शकतो.”

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, हाउसिंग सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button