Skip to content

Mahaenews

Subscribe
  • Home
  • महाराष्ट्र
    • पिंपरी / चिंचवड
    • मुंबई
    • पुणे
  • राष्ट्रिय
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • पाटी-पुस्तक
  • क्रिडा
  • लोकसंवाद – संपादकीय
  • E-papaer
  • संपर्क
  • English

Mahaenews

  • Home
  • महाराष्ट्र
    • पिंपरी / चिंचवड
    • मुंबई
    • पुणे
  • राष्ट्रिय
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • पाटी-पुस्तक
  • क्रिडा
  • लोकसंवाद – संपादकीय
  • E-papaer
  • संपर्क
  • English
  • Home
  • 2025
  • October
  • 2
  • पिंपरी-चिंचवड महापालिका: महिला बचत गटांसाठी देशातील पहिला ई-लिलाव
पिंपरी-चिंचवड महापालिका: महिला बचत गटांसाठी देशातील पहिला ई-लिलाव
  • टेक -तंत्र । उद्योग । व्यापार
  • ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड महापालिका: महिला बचत गटांसाठी देशातील पहिला ई-लिलाव

Adhikrao Dive PatilOctober 2, 202501 mins

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत मौजे आकुर्डी येथील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळे महिला बचत गटांना भाडेकराराने देण्यासाठी ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावात तब्बल ९७ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मे. रिलायन्स ऑकशन चे प्रतिनिधी इब्राहीम खान यांच्या सहकार्याने एकूण ४९ गाळे ई-लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यात दिव्यांग महिला बचत गटांसाठी २, तृतीयपंथी गटासाठी १, कोविड योद्धा महिला बचत गटासाठी १, आदिवासी महिला बचत गटासाठी २, DAY-NULM अंतर्गत ३, तर पीसीएमसी सक्षमा अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी तब्बल ४० गाळ्यांचे आरक्षण करण्यात आले.

या ई-लिलावात १५,१०० रुपये ते ३२,००० रुपये या दरम्यान बोली लावली गेली. विशेष म्हणजे, महिला बचत गटांना गाळे वाटप करण्यासाठी आयोजित केलेला हा देशातील पहिलाच ई-लिलाव ठरला आहे.गाळे प्रथम तीन वर्षांसाठी भाड्याने देण्यात येणार असून कामकाज समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षांची मुदतवाढ मिळेल. भाडे व देखभाल शुल्काचा भरणा संबंधित गटानेच करायचा आहे. विलंब झाल्यास दंड आकारला जाईल. गाळ्यांचा वापर केवळ नोंदणीकृत बचत गटांनाच करता येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत महिलांना उपजीविका निर्मितीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आकुर्डी फूड कोर्टाद्वारे आपण ही सुरूवात केली आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी देणे आणि समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हा आमचा उद्देश आहे. गाळ्यांचे वाटप पारदर्शक पद्धतीने ई-लिलावाद्वारे करण्यात आल्यामुळे प्रत्येक गटाला समान संधी मिळाली आहे. या उपक्रमामुळे महिला बचत गटांच्या कार्याला प्रोत्साहन मिळून त्यांची आत्मनिर्भरता वाढेल आणि पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजक महिलांची नवी पिढी घडेल.

  • ममता शिंदे, उप आयुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी-चिंचवड. 

Share this:

  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on X (Opens in new window) X

Like this:

Like Loading…
Tagged: 97 self-help groups participated ९७ बचत गटांचा सहभाग PCMC Social Development Department's historic e-auction for women! 49 gallas distributed PCMC समाज विकास विभागाचा महिलांसाठी ऐतिहासिक ई-लिलाव! ४९ गाळ्यांचे वाटप women move towards self-sufficiency महिलांना स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Post navigation

Previous: शिक्षण विश्व: भोंडल्याचा उत्साह, विद्यार्थ्यांनी धरला ठेका!
Next: विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आयोजित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

रत्नागिरीला ‘एज्युकेशन हब’ बनविण्याचा संकल्प; केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव, टिळक विद्यालय पुनर्बांधणीचे लोकार्पण

रत्नागिरीला ‘एज्युकेशन हब’ बनविण्याचा संकल्प; केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव, टिळक विद्यालय पुनर्बांधणीचे लोकार्पण

October 7, 2026
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राहुल गांधी पुन्हा ताब्यात; जंतरमंतरकडे जाताना दिल्ली पोलिसांची कारवाई

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राहुल गांधी पुन्हा ताब्यात; जंतरमंतरकडे जाताना दिल्ली पोलिसांची कारवाई

October 7, 2026
संकटाच्या क्षणी शिवराज मोरे मदतीला धावले; संबंधित तरुणीने व्यक्त केली कृतज्ञता

संकटाच्या क्षणी शिवराज मोरे मदतीला धावले; संबंधित तरुणीने व्यक्त केली कृतज्ञता

October 7, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी केंद्राकडे विशेष मदतीची मागणी; अमित शाहांची सकारात्मक भूमिका, ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय पथकाची पाहणी

महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी केंद्राकडे विशेष मदतीची मागणी; अमित शाहांची सकारात्मक भूमिका, ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय पथकाची पाहणी

October 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
    • पिंपरी / चिंचवड
    • मुंबई
    • पुणे
  • राष्ट्रिय
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • पाटी-पुस्तक
  • क्रिडा
  • लोकसंवाद – संपादकीय
  • E-papaer
  • संपर्क
  • English
Online Newspaper - News / Magazine WordPress Theme 2026.
Back To Top
%d