Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘डी. वाय. पाटील’अभियांत्रिकी महाविद्यालयाचा टेबल टेनिस संघ सलग तिसऱ्यांदा अजिंक्य!

शिक्षण विश्व: नामांकित २७ महाविद्यालयांच्या संघांशी लढत देत पटकाविले अजिंक्यपद

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी येथील टेबल टेनिस संघाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावले आहे. राज्यातील नामांकित २७ महाविद्यालयांच्या संघांशी लढत देत, डीवायपीसीओईच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेवर आपली छाप सोडली.

या तिसऱ्या सलग विजयामुळे महाविद्यालयाने स्पर्धेतील सातत्य, टीमवर्क आणि जिद्दीचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. या कामगिरीमुळे डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावर क्रीडा क्षेत्रात विशेषतः टेबल टेनिसमध्ये अत्युच्च स्थानावर पोहोचले आहे.

प्रणव पाटील – आर.एन.ए.,राज कोठारी – आय.टी., अमन शर्मा – ईएनटीसी, आदित्य लाटकर – मेकॅनिकल
शंतनू निरफळे – ईएनटीसी विजयी संघातील खेळाडू आहेत.

हेही वाचा      :        ‘रंगानुभूति’ सारख्या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडची ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून ओळख निर्माण होतेय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवाद्गार 

संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट समन्वय राखत, सामन्यांमध्ये आत्मविश्वासाने खेळ करत विजय संपादन केला. प्रत्येक खेळाडूने संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या संघाच्या यशामध्ये त्यांचे कठोर प्रशिक्षण, समर्पण आणि महाविद्यालयाच्या पाठबळाचा मोठा वाटा आहे.
या उल्लेखनीय कामगिरीनंतर दोन खेळाडू, प्रणव पाटील आणि राज कोठारी यांची तीन दिवसांच्या आंतर-झोनल प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. हे दोघेही यानंतर आंतर-झोनल स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.

महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आबाजी माने यांनी संघाचे अभिनंदन करताना सांगितले की, “या यशामागे खेळाडूंची अथक मेहनत आणि महाविद्यालयाचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आहे. हे यश संपूर्ण महाविद्यालयासाठी गौरवाचे क्षण घेऊन आले आहे.”
या ऐतिहासिक विजयानंतर महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून संघाचे कौतुक होत आहे. आगामी स्पर्धांमध्येही संघ असेच यश मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group