Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा यांना ED चा झटका

ऑनलाइन सट्टेबाजी प्लेटफॉर्म्स विरोधात चौकशी वेगाने सुरु

मुंबई : ऑनलाइन बेटिंग App प्रकरणात भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा यांना हजर होण्यास सांगितलं आहे. प्रवर्तन निर्देशालय म्हणजे ED ने दोघांना नोटिस पाठवून चौकशीसाठी बोलावलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ED ने 22 सप्टेंबर रोजी उथप्पाला चौकशीसाठी बोलावलं आहे, तर 23 सप्टेंबरला युवराज सिंहला बोलावलं आहे. दोन्ही क्रिकेटपटुंची चौकशी दिल्ली स्थित ED च्या हेडक्वार्टरमध्ये होईल. या दोन भारतीय क्रिकेटपटूंशिवाय अभिनेता सोनू सूदची सुद्धा 23 सप्टेंबरला ED कडून चौकशी होणार आहे.

आता प्रश्न हा आहे की, ED रॉबिन उथप्पा आणि युवराज सिंहची कुठल्या प्रकरणात चौकशी करणार आहे?. भारताच्या या दोन्ही माजी क्रिकेटपटुंची ऑनलाइन बेटिंग ऐप प्रकरणात चौकशी होईल. या प्रकरणात ED समक्ष हजर होणारे क्रिकेटपटू फक्त युवराज आणि उथप्पा नाहीय, तर याआधी सुरेश रैना आणि शिखर धवनला सुद्धा हजर झाले होते. ED कडून भारतीय क्रिकेटर्सच्या चौकशीच हे प्रकरण बेटिंग App 1xBet शी संबंधित आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

प्रवर्तन निर्देशालय ED ने मागच्या काही काळापासून ऑनलाइन सट्टेबाजी प्लेटफॉर्म्स विरोधात चौकशी वेगाने सुरु केलीय. या प्रकरणात ED ची चौकशी धन शोधन निवारण अधिनियम यानी PMLA अंतर्गत सुरु आहे.

ED काय विचारणार?

प्रवर्तन निदेशालय म्हणजे ED युवराज आणि उथप्पाला 1xBet सोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल विचारु शकते. त्यांचा कंपनीसोबत कशा प्रकारचा करार होता? त्यांना किती पैसे मिळाले? या सर्व मुद्यांवर प्रश्न-उत्तर होऊ शकतात.

App 70 भाषांमध्ये उपलब्ध

ED ची ही चौकशी कथित ऑनलाइन बेटिंग App शी संबंधित आहे. यात कोट्यवधि रुपयांची फसवणूक आणि मोठ्या प्रमाणात टॅक्स चोरीचा आरोप आहे. कंपनीनुसार, 1xBet बेटिंग APP ला बिझनेसमध्ये 18 वर्षांचा अनुभव आहे. हे जागतिक स्तराच सट्टेबाजी App आहे. कंपनीची वेबसाइट आणि एप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहे. तिथे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांसाठी सट्टा लावू शकतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button