Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीतील मूर्ती संकलन उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अतिश बारणे यांची संकल्पना; 3,800 गणेश मूर्तींचे संकलन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या गणेश मूर्ती संकलन या उपक्रमांतर्गत यंदाच्या गणेशोत्सवात 3,800 मूर्ती संकलित करण्यात आल्या आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गणेश मूर्ती संकलन उपक्रमास मोशी परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

आतिश बारणे यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या या उपक्रमाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिसाद मिळाला. गणेश विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. विसर्जनासाठी घरगुती गणपतीसह सार्वजनिक मंडळांनीही या पर्यावरणपूरक संकल्पनेला प्रतिसाद दिला.

हेही वाचा       :        कृष्णा कारखान्याचा ३३११ रुपयांचा अंतिम ऊस दर, १११ रुपयांचे अंतिम बिल लवकरच होणार वर्ग  

या उपक्रमांतर्गत संकलित मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने आणि पर्यावरणपूरक रीतीने विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या मूर्ती संकलन केंद्रांचा लाभ घेतला.

या उपक्रमामुळे नागरिकांना सुलभ व सुरक्षित विसर्जनाची सुविधा उपलब्ध झाली असून, परिसरात जलप्रदूषण टाळण्यास मदत झाली आहे. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांनी अतिश बारणे यांचे आभार मानले असून, असे उपक्रम पुढील काळातही सुरू राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button