महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर 318 हरकती
उद्यापासून प्रधान सचिव प्रवीण दराडे घेणार सुनावणी

12 सप्टेंबर पर्यंत हरकतींवर सुनावणीची मुदत; वार्ड क्रमांक दहा मध्ये सर्वाधिक 110 हरकती प्राप्त
पिंपरी चिंचवड| प्रतिनिधी:
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेनवर विहित मुदतीत अर्थात 4 सप्टेंबर पर्यंत318 हरकती व सूचना आल्या आहेत. अशी माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली. दरम्यान प्रधान सचिव प्रवीण दराडे घेणार सुनावणी पाच ते १२ सप्टेंबर दरम्यान हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान वार्ड क्रमांक दहा मध्ये सर्वाधिक 110 हरकती प्राप्त झाले आहेत.
महापालिकेने 22 ऑगस्टला चार सदस्यीय 32 प्रभागरचना जाहीर केली. प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे महापालिकेचे संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, महापालिका भवनातील वाहनतळामध्येही लावण्यात आले आहेत. प्रारूप प्रभागरचनेवर जास्त हरकती किंवा सूचना नोंदवण्यात आलेल्या नव्हत्या. 3 सप्टेंबर पर्यंत केवळ 42 हरकती आल्या आहेत. यामध्ये माजी महापौर मंगला कदम यांनी सूचना दाखल केली आहे. हरकती व सूचना चार सप्टेंबर दुपारी तीनपर्यंत महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक कार्यालयात लेखी स्वरूपात स्वीकारण्यात येणार होत्या त्यानुसार 318 हरकती आणि सूचना प्राप्त झाला असल्याचे निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
एक गठ्ठा हरकती स्विकारण्यास नकार
हरकती व सूचना देण्याच्या कालावधीत एक गठ्ठा हरकती घेण्यास निवडणूक विभागाने नकार दर्शविला आहे. चिखली गावठाण, रिव्हर रेसीडन्सी, कुदळवाडी, बो-हाडेवाडी, जाधववाडी या प्रभाग क्रमांक 2 मधील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता दोन पिशव्या भरून 900 हरकती घेऊन आला होता. मात्र, निवडणूक विभागाने एक गठ्ठा हरकती स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे एका अर्जावर चार ते पाच हरकती घेता येऊ शकतात. किंवा प्रत्येक व्यक्तीने एकच हरकत द्यावी, अशी अट टाकून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने नियमावर बोट ठेवून मोठ्या प्रमाणात गठ्ठ्याने आलेल्या हरकती नाकारल्या.
प्रधान सचिव प्रवीण दराडे घेणार सुनावणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची राज्य शासनाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पाच ते १२ सप्टेंबर दरम्यान हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभागगरचनेची प्रक्रिया सुरु होणार आहे. अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण निश्चिती होणार आहे.





