ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांनी केले थाटामाटात गणेशाचे स्वागत!

शिक्षण विश्व: एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये गणराय विराजमान

पिंपरी चिंचवड  : आळंदी रोड, भोसरी येथील एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये गणेश चतुर्थीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रम दुपारी दोन वाजता शाळेच्या प्रांगणात सुरू झाला.

या प्रसंगी पांडुरंग गवळी, स्वप्नील गवळी, संकल्प गवळी, नितीन लोणारी, मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात गणेशस्थापनेने झाली. यानंतर गणेश वंदना सादर करण्यात आली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा –  मुकेश अंबानी– गौतम अदानी इंधन विक्रीसाठी एकत्र

कार्यक्रमात गणेश चतुर्थीचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. समारोपाला सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण झाला असून, त्यांना परंपरांचे महत्त्वही समजले असे मुख्याध्यापक गायकवाड म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button