Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘ मास्टर माईंड ‘मध्ये 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

शिक्षण विश्व: मास्टर माईंड स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘मिशन सिंदूर’ थीमवर विविध कार्यक्रम

पिंपरी चिंचवड: मास्टर माईंड स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा महोत्सव अर्थात 79 वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या वातावरणात आणि सन्मानपूर्वक पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाने झाली. शाळेच्या प्रांगणात आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे मेजर जनरल जे. एन. नायर, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर, तसेच प्रशासक मनीकंदन नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या वेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यसंग्रामातील शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण करून दिले आणि आजच्या पिढीसमोर असलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. यानंतर शालेय गीताचे तसेच शाळेतील खेळाडूंना समर्पित जर्सी टी-शर्टचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सांगतेस ‘वंदे मातरम’ या सामूहिक गीताने समारोप करण्यात आला. एकूणच, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मास्टर माईंड स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा सुंदर संगम साधला.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि नाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावर्षी शाळेत “मिशन सिंदूर” या विशेष थीमवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य, अभिनय व गायन कौशल्याचा बहारदार सादरीकरण केले. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

देशभक्तीचा संदेश एरोमॉलमध्येही

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी एरोमॉल येथे जाऊन “मिशन सिंदूर” वर आधारित मॉब डान्स देशभक्तीवर आधारित ऍक्ट व पथनाट्य सादर केले. यामुळे परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले गेले आणि विद्यार्थ्यांमधील देशप्रेमाची भावना अधोरेखित झाली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button