Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पायाभूत चाचणीची समाजमाध्यमांत पेपरफुटी

Share On

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरी ते नववीच्या परिक्षेच्या प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे खासगी यू-ट्युब वाहिनीच्या माध्यमातून फोडल्याची घटना उघडकीस आली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी न घेता प्रश्नपत्रिका प्रसारित केल्या प्रकरणात आता खासगी यू-ट्युब वाहिनीवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्यूशन क्लासेस या तीन खासगी यू-ट्युब वाहिन्यांची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी सहायक संचालक संगीता प्रभाकर शिंदे (५०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला. त्यानुसार खासगी यू-ट्युब वाहिनीवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर परिक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत आधिनियमाच्या विविध कलमान्वये तसेच माहिती तंत्रज्ञान, भारतीय न्यायसंहितेच्या ७२, २२३ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार संगीता शिंदे या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राज्य शासनाने २०२१ पासून इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रथम भाषा मराठी, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी सुरू केली आहे. त्यानंतर २०२३ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्या वतीने राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय व अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी परिषदेतर्फे पायाभूत चाचणी ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी, सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई या सर्वाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता.

हेही वाचा –  मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात तुफान राडा, दादा भुसे रवाना होताच…

१७ ते ३१ जुलैपर्यंत परिषदेच्या वतीने परिक्षेसाठी लागणारी कागदपत्रे खाजगी कार्गो कंपनी मार्फत पाठविण्यात आली होती. त्यानंतर ६ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता एका यू-ट्युब वाहिनीवर संबधित जिल्ह्यांना पाठविलेल्या चाचणी पत्रिका त्यापैकी सातवीचे मराठीचा, ५ ऑगस्टला झालेला आणि ७ ऑगस्टला होणाऱ्या सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची गणिताचे प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान यू-ट्युब वाहिनीची माहिती घेतल्यानंतर कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्यूशन क्लासेस या तीन यू-ट्युब वाहिन्यांची नावे पुढे आली. कोणतीही परवानगी न घेता अज्ञाताकडून या प्रश्नपत्रिका मिळवून या वाहिन्यांवर प्रश्न व त्यांची उत्तरे प्रसारित करून शासकीय आदेशाचा भंग केला. त्यानुसार या वाहिन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button