Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

माटे हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक,परिवहन समितीची स्थापना

शिक्षण विश्व: विद्यार्थी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन समितीची स्थापना

पिंपरी चिंचवड: व्ही.के. माटे हायस्कूल चिंचवड मध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक समितीची स्थापना करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त,प्राचार्या इंद्रायणी माटे पिसोळकर होत्या.

प्राचार्या इंद्रायणी माटे पिसोळकर म्हणाल्या 2025 -26 या शैक्षणिक वर्षापासून मोरया शिक्षण संस्थेच्या सर्व संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक ही मोरया शिक्षण संस्थेने अधिकृतरित्या करार केलेल्या.श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस यांच्यामार्फत पुरवल्या जाणाऱ्या स्कूल बस मधूनच करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा त्या बसमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे येथून पुढे श्री स्वामी समर्थ एंटरप्राईजेस यांच्या स्कूल बस मधूनच विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येण्याचे पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ इंटरप्राईजेस यांच्या स्कूलबस मध्ये विद्यार्थी व पालकांसाठी सुरक्षितता देण्यासाठी जीपीएस यंत्रणा, टॅपिंग प्रेझेंटी, लाईव्ह लोकेशन अधिकृत वाहन चालक व मावशी व वेळेवर विद्यार्थ्यांना शाळेत आणण्याचे व घरी सोडण्याचे नियोजन , प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र बसण्याची जागा या सर्व सुविधा देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष श्री स्वप्निल शेडगे यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ इंटरप्राईजेस चे संचालक श्री. नवले यांनी श्री स्वामी समर्थ इंटरपाईजेस यांच्यामार्फत या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिले .मोरया शिक्षण संस्थेने नाकारलेल्या ,परवानगी न दिलेल्या किंवा संस्थेशी करार नसणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅन मधून विद्यार्थ्यांना पालकांनी पाठवू नये असे आवाहन मोरया शिक्षण संस्थेचे , परिवहन समितीचे अध्यक्ष श्री स्वप्निल शेडगे यांनी सांगितले.

हेही वाचा –  शिक्षणातून विद्यार्थ्यांना अनुभव मिळणे महत्त्वाचे- डॉ.दीपक शाह

परिवहन समितीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे गठित करण्यात आली. अध्यक्ष स्वप्निल शेडगे उपाध्यक्ष इंद्रायणी माटे- पिसोळकर ,लोकप्रतिनिधी शितल शिंदे, सचिव हनुमंत हुचगोळ ,समिती सदस्य रणजीत सावंत, दिलीप साळुंके, विलास पाटील, चित्रा आपटे, पूजा पिसाळ, छाया कुलकर्णी वाहतूक कंत्राटदार महेश नवले ,वाहतूक विभाग चिंचवड शंकर ढामसे मोरया शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांची एकत्रित परिवहन समिती गठीत करण्यात आली. सूत्रसंचालन हनुमंत हुचगोळ यांनी केले तर आभार विलास पाटील यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button