Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांना मिळाली स्पर्धा परीक्षेची ‘दिशा’

शिक्षण विश्व: आळंदीतील एमआयटी महाविद्यालयात "करियर लॉन्चपॅड” कार्यक्रम उत्साहात

पिंपरी चिंचवड : एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी (देहू फाटा), पुणे येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षाच्या वतीने “करिअर लॉन्चपॅड” स्पर्धा परीक्षांवरील जागरूकता” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीची दिशा मिळाली.

हा कार्यक्रम कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये साजरा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक डॉ. बी. बी. वाफारे , डीन डॉ. सुनील महाजन, डॉ. मानसी अतितकर, उपनिदेशक प्रो. अक्षदा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सत्रामध्ये ‘युनिक अकॅडमी’चे प्रा. केतनकुमार पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना विविध स्पर्धा परीक्षांबाबत सखोल माहिती दिली. त्यांनी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी यांसारखे स्पर्धा परीक्षा तसेच जीएटीइ, सेट, नेट, आयटी ऑफिसर अशा संगणकशास्त्राशी संबंधित परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, तयारीचे तंत्र, वेळेचे व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा –  गोविंदा रे गोपाळा… ! गोविंदांनो आता निश्चिंत रहा, अपघात झाल्यास सरकार देणार मदत

या सत्रात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि थेट संवाद साधण्याची संधी देण्यात आली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्ष समन्वयक प्रा. दीक्षा कदम , प्रा. राजश्री एस. खडके व प्रा. ज्योती पी. सरवदे यांनी उत्तम प्रकारे संयोजन केले. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षाच्या सर्व सदस्यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती लाभली.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या संधी आणि योग्य दिशेने तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करणारा ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button