Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

आपलं वाटोळं झालं आहे, आयटी पार्क हैदराबाद, बंगळुरूला चाललं; अजित पवारांनी सरपंचांना सुनावले खडेबोल

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला. दोन आठवड्यापूर्वीच अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला होता. त्यादरम्यान अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या होत्या. त्याची काही प्रमाणात पूर्तता झाली आहे का? अधिकारी तत्परतेने काम करत आहेत का? यासाठी आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी हिंजवडीचा दौरा केला. यावेळी अजित पवारांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलंच सुनावलं.

हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर हे मंदिर न पाडण्यासाठी आग्रह करत होते. यावर अजित पवार म्हणाले, धरण बांधताना मंदिर जातातच, तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचं ते करतो. आपलं वाटोळ झालं. हिंजवडीचं सगळं आयटी पार्क पुण्यातून बाहेर जात आहे. तुम्हाला काही पडलेलं नाही. कशाला इथं सकाळी सहाला आलो आहे. ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.

हेही वाचा      :      तिहासिक करारामुळे भारतातील शैक्षणिक व उद्योग क्षेत्रास उपयोग; माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे 

अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना देताना सांगितले की, कोणीही कामात अडथळा आणल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, मग तो कोणीही असो. 353 दाखल करा, मग तो अजित पवार असला तरीही, असे ते म्हणाले. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button