Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडी, बालघरेवस्ती परिसरातील पाणी प्रश्न तातडीने सोडवा

माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांची सूचना

अधिकाऱ्यांसमोर वाचला अनियमित, अस्वच्छ पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा पाढा

पिंपरी | कुदळवाडीतील बालघरे वस्ती येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी माझी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने बैठक पार पडली यावेळी या परिसरात होत असलेला अस्वच्छ पाणी पुरवठा अनियमित पाणीपुरवठ्यामुळे होणारे नागरिकांची गैरसोय या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला तातडीने यावर उपाययोजना करण्यात याव्या प्रशासनाने स्वच्छ पाणीपुरवठ्याची गंभीर दखल घ्यावी अशा सूचना दिनेश यादव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

कुदळवाडी, बालघरेवस्ती भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित व अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिक, विशेषतः महिलावर्ग, त्रस्त झाला होता. त्यामुळे समस्या समजून घेण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा     :    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

बैठकीस मोठ्या संख्येने महिला वर्ग व परिसरातील नागरिक उपस्थित होत्या. त्यांनी थेट अधिकाऱ्यांपुढे आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. यामध्ये वेळेवर पाणी न मिळणे, कमी दाबाने येणारे पाणी, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, तसेच टँकर सेवा असमाधानकारक असणे यासारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश होता.

कुदळवाडी बालघरे वस्ती परिसरासाठी नियमित व वेळेवर पाणी पुरवठा करावा. वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय केला जाव्यात. पाईपलाइनमधील बिघाडाचे तत्काळ निराकरण करून पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा अधिकारी प्रीतम बाविस्कर यांच्या समोर नागरिकांनी या तक्रारी मांडल्या यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group