Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी सुरू; RSS आणि भाजपची नागपुरात समन्वय बैठक

Share On

Nagpur :  नागपुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या समन्वय समितीची बैठक आज (15 जून) रेशीमबाग येथील कार्यालयात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीमध्ये संघाच्या सर्व 32 संघटनांचे प्रतिनिधी आणि भाजपचे महत्त्वाचे नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा –  “महाराष्ट्राच्या हिताचे असेल तसे वागायला आम्ही तयार”; आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

चार महिन्याने महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत संघाच्या संघटना भाजपसाठी निवडणूक प्रचारात उतरल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप संघाच्या मदतीद्वारे काम सुरू करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला हल्ल्यानंतर, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर याचे संघाने समर्थन केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेली मागणी यावरही संघ भाजप समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कामकाजाचा प्रचार करण्यासाठी भाजपने विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. त्याबाबतही संघ दिशा देऊ शकते, त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जाते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button