देशाचे चार तुकडे होण्याची पाकला भीती : भारतावर एका रात्रीत पाचशे ड्रोन हल्ले : सर्व अयशस्वी !
पाकचे पळपुटे पंतप्रधान, लष्करप्रमुख, अनेक मंत्री देशातून गायब : कॅनडात आश्रयाला?

कुख्यात दाऊद, छोटा शकीलचा चक्क पाकिस्तानातून पोबारा!
नवी दिल्ली / इस्लामाबाद / श्रीनगर : प्रतिनिधी / महाईन्यूज
भारताकडून होत असलेल्या लष्करी कारवाईचा पाकिस्तानच्या नेत्यांनी एवढा धसका घेतला आहे, की राजकीय नेते पाकिस्तानातून गायब होण्यास सुरुवात झाली आहे. कुख्यात दहशतवाद्यांनी एक तर आपल्या बंकरमध्ये किंवा ज्या ठिकाणी भारताला पत्ता लागणार नाही अशा ठिकाणी लपून बसण्यास प्राधान्य दिले आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांनी तर परदेशात पलायन करून अज्ञात स्थळ गाठले आहे. पळपुटे राजकीय नेते मात्र कॅनडाच्या आश्रयाला गेले असल्याचे वृत्त आहे.
अचूक हल्ले, पाकड्यांना धडकी..
भारताकडून मोजकेच पण अचूक हल्ले होत असल्याचे निष्पन्न झाले असून पाकिस्तानचे पळपुटे पंतप्रधान शहाबाज शरीफ, लष्करप्रमुख आणि अनेक मंत्री कॅनडाच्या आश्रयाला गेले आहेत. त्याचप्रमाणे, कुख्यात दाऊद इब्राहिम, छोटा शकील यांनीही देशातून पोवारा केला आहे. हाफिज सईद सारख्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानातच आपापल्या सुरक्षित जागा बळकावल्या आहेत.
हेही वाचा – “पाकिस्तानने औकातीत राहून भारताशी पंगा घ्यावा, अन्यथा नामोनिशाण”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
पाकड्यांचे पाचशे ड्रोन हल्ले..
भारतीय लष्कराच्या नियोजनबद्ध, शिस्तबद्ध अचूक कारवाईमुळे वैतागलेल्या पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी रात्री भारतीय सीमेलगतच्या गावांवर आणि शहरांवर सुमारे ५०० ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. सीमेवर सजग आणि अलर्ट असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले आणि पाकड्यांना चांगलीच चपराक दिली आहे.
कराचीतून दाऊद इब्राहिम गायब
मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पळून गेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानातील कराची येथे आश्रयास होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले असून दहशतवाद्यांना देत असलेला पाठिंबा त्यांनी काढला आहे. अशा परिस्थितीत, भारताकडे दाऊद इब्राहिमला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्याची मोठी संधी आहे, हे तेथील दहशतवादी देखील जाणून आहेत.
मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी..
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दाऊद इब्राहिम हा मुख्य आरोपी आहे. तो भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्येही सहभागी होता. सुरुवातीच्या काळात तो दुबईत राहत होता, पण नंतर तो त्याच्या कुटुंबासह पाकिस्तानात आला आणि तेव्हापासून कराचीतच लपून बसला.
दाऊद कोणत्या देशांमध्ये लपू शकतो?
दुबई आणि पाकिस्तान व्यतिरिक्त दाऊद आणि त्याचा साथीदार छोटा शकील लंडन, ब्राझील, फिलीपिन्स, हाँगकाँग आणि जर्मनीसारख्या सुरक्षित देशांमध्ये लपू शकतात. गुन्हेगारांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण लंडन आणि ब्रिटनमधील आहेत. लंडनमधील पोलिस आणि न्यायव्यवस्था विश्वासार्ह मानली जाते. अशा परिस्थितीत, हे गुन्हेगार अशा देशांचा शोध घेतात, जिथे त्यांच्या अटकेचा धोका जवळजवळ नसतो. त्यांच्या व्यवस्थांमध्ये कायदेशीर गुंतागुंत आहे ज्यामुळे गुन्हेगार सुरक्षित राहतात.
.. तर एक गठ्ठा तीन हजार दहशतवादी ठार झाले असते !
भारताच्या कारवाईच्या पहिल्या दिवशी अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाला, अन्यथा मदरशातच एक गठ्ठा ३००० दहशतवादी ठार झाले असते. मुरिदके प्रांताला लष्कर-ए-तोयबा का गढ मानला जातो.१९८० च्या दशकात हाफिज सईद याने येथे एक मदरसा बनवला होता. येथेच लष्करच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि काश्मीर खोऱ्यात सोडले जाते. ‘अल-जजीरा’ च्या वृत्तानुसार या मुरिदकेच्या मदरशात जर काही मिनिटांच्या आधी भारताचा एअर स्ट्राईक झाला असता, तर एकाच वेळी लष्करचे ३००० दहशतवादी एकाच जागीच ठार झाले असते.




