Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड गुन्हेवृत्त: कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कामगार महिलेवर गुन्हा दाखल

Share On

काळेवाडी : कंपनीमध्ये काम करत असलेल्या कामगार महिलेने कंपनीच्या वेबसाईट प्रमाणेच बनावट वेबसाईट तयार करून कंपनीच्या ग्राहकांकडून व्यवसाय घेत कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी कामगार महिलेसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत रहाटणी येथे ग्रिनेक्स एन्व्हायरॉन्मेंटल कंपनीत घडली.

हेही वाचा  :  अर्थव्यवस्था वाढण्यासाठी शेती, शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक आवश्यक; हर्षवर्धन पाटील 

याप्रकरणी कंपनी चालक महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रहाटणी येथे राहणारी महिला आणि तिचा साथीदार रुपेश निनावे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला फिर्यादी यांच्या ग्रिनेक्स एन्व्हायरॉन्मेंटल कंपनीमध्ये काम करते. आरोपींनी ग्रिनेक्स कंपनीच्या वेबसाईट प्रमाणेच दुसरी वेबसाईट तयार केली. बेंगलोर येथील एका कंपनीला कार्बन फूटप्रिंट आणि रिक्वायरमेंटसाठी कोटेशन कंपनीच्या अधिकृत मेलवरून पाठवले. फिर्यादी यांच्या कंपनीच्या नावाप्रमाणेच नाव असणारी दुसरी कंपनी स्थापन करून आरोपी महिलेने कंपनीच्या गोपनीयता कराराचा भंग करत कंपनीची फसवणूक केली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button