ताज्या घडामोडी

भारत-अमेरिका प्रत्यर्पण करारातंर्गत तहव्वुर राणाला भारतात पाठवण्याचा आदेश

मुंबईवरील 26/11 हल्ल्याशी संबंधित एका मोठा आरोपी अमेरिकन तुरुंगात बंद

अमेरिका : मुंबईवर 2008 साली 26/11 चा भीषण हल्ला झाला होता. आजही मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून ताज हॉटेलसह अन्यत्र अंदाधुंद गोळीबार केला होता. आजही या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. तिथे आरामात आयुष्य जगत आहेत. याच हल्ल्यातील एक आरोपी तहव्वुर राणा अमेरिकन तुरुंगात बंद आहेत. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे. एकप्रकारे अमेरिकी कोर्टात भारताचा हा मोठा विजय आहे. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेच्या सत्र न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यर्पण करारातंर्गत तहव्वुर राणाला भारतात पाठवण्याचा आदेश दिला होता. सत्र न्यायालयाने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा केला होता. पण राणाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर लगेच शुक्रवारी याबाबत निर्णय झाला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली. तहव्वुर राणाला आता भारतात आणलं जाईल. त्याच्यावर इथे खटला चालेल. 26/11 हल्ल्यातील त्याचा रोल काय? कारस्थान कसं रचलं? या सगळ्याची चौकशी होईल.

हेही वाचा   :  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांना शपथ 

त्याला भारतात आणून चौकशी करणं खूप महत्त्वाचं, कारण….
तहव्वुर राणावर आरोप आहे की, त्याने 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केली होती. हेडलीच्या इशाऱ्यावर तो संपूर्ण कट अमलात आणत होता. राणा डेविड हेडलीचा राइटहॅण्ड होता. कंट्रोल रुममध्ये जो माणूस बसलेला तो तहव्वुर राणाच होता असं म्हटलं जातं. मुंबई हल्ल्यातील दोषी राणा भारतात आल्यानंतर तपास यंत्रणांना 26/11 हल्ल्याच्या कारस्थानाबाबत बरीच माहिती मिळू शकते. कोणाची काय भूमिका होती? कोण-कोण या कटात सहभागी होते, ते स्पष्ट होईल. अनेक नावं अजून समोर आलेली नाहीत, तहव्वुर राणाच्या चौकशीतून ती माहिती मिळू शकते.

अमेरिकेत त्याला अटक कधी झालेली?
भारताने अमेरिकन कोर्टात मजबूत पुरावे सादर केले. यात राणाचा सहभाग स्पष्ट झाला. राणाला 2009 साली शिकागो येथून अटक करण्यात आली होती. FBI ने त्याला अरेस्ट केली होती. राणा हा पाकिस्तानी ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेटिव आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button