पोलीस मित्र संघटना दिनदर्शिका २०२५चे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन समारंभ पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पोलीस मित्र संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “पोलीस मित्र संघटना पोलिसांसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे कार्य करत आहे. पोलिस व नागरीक यांच्यातील संवाद आणि सहकार्य वाढविण्यात ही संघटना मोलाचे योगदान देत आहे. यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल.”
हेही वाचा : शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा दावा
पोलीस मित्र संघटनेची दिनदर्शिका राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, संघटनेचे पदाधिकारी संदीप खर्डेकर, मनीष सोनिग्रा, चैतन्य जगताप, तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेच्या पुढील उपक्रमांबाबत यावेळी अधिक माहिती देण्यात आली. तसेच जनतेचे पाठबळ व पोलिसांचे सहकार्य मिळवून समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.




