Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिझ्झामध्ये आढळला तुटलेल्या चाकूचा तुकडा, भोसरीतील प्रकारामुळे खळबळ

पिंपरी | ऑनलाइन मागवलेल्या पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळला. या घटनेमुळे संबंधित कुटूंब आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये शुक्रवारी (दि. ४) रात्री हा प्रकार उघडकीस आला.

इंद्रायणीनगरमध्ये राहणार्‍या अरुण कापसे यांनी शुक्रवारी रात्री ५९६ रुपयांचा पिझ्झा ऑनलाइन मागवला. पिझ्झा मिळाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत पिझ्झाचा आस्वाद घेत होते. त्यावेळी त्यांना काहीतरी कठीण वस्तू दातात लागल्याचे जाणवले. त्यांनी नीट पाहिले असता तो चाकूचा तुटलेला तुकडा असल्याचे दिसून आले. या धक्कादायक घटनेनंतर कापसे यांनी तत्काळ पिझ्झा कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. मात्र, सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर व्यवस्थापक कापसे यांच्या घरी आला.

हेही वाचा    –      चीनमध्ये कोरोनासारख्या व्हायरसचा प्रकोप! स्मशानभूमीत मृतदेहांचा खच, पण नेमकी लक्षणं काय?

पिझ्झामधील तुटलेला चाकूचा तुकडा पाहून व्यवस्थापकही अचंबित झाला. पिझ्झा कट करण्याच्या कटरचा तो तुकडा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कापसे यांना पिझ्झाचे पैसे परत करण्यात आले. संबंधित घटनेमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे. चाकूचा तुकडा पिझ्झामध्ये आढळल्याने ऑनलाइन पिझ्झा कंपनीच्या सेवेबद्दल आणि खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी कार्यवाहीसाठी कापसे पुणे जिल्हा अन्न प्रशासनाकडे तक्रार नोंदविणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button