Year Ender 2024 | महाराष्ट्रातलं २०२४ हे वर्ष राजकीयदृष्ट्या कसं होतं?

Year Ender 2024 | 2024 हे वर्ष राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं वर्ष ठरलं. राजकीय पक्षाचे अस्तित्व निश्चित करणारे निकाल, विविध आंदोलनं ते राज्यात स्थापन झालेलं नवीन सरकार, अशा अनेक राजकीय घडामोडी या वर्षात बघायला मिळाल्या. आपण महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात..
आरक्षण आंदोलन
मनोज जरांगेंनी 20 ते 26 जानेवारी दरम्यान अंतरवाली सराटी ते आझाद मैदान मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा काढला.
मराठा समाजाला नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक 20 फेब्रुवारीला विधीमंडळात मंजूर झाले.
आरक्षणात सगेसोयऱ्यांच्या समावेश आणि OBCतून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगेंनी 8 जूनला अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंनी 13 जूनला ओबीसी आरक्षण आंदोलन सुरू केले.
पक्ष, चिन्ह, अपात्रता आणि निकाल
शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र करता येणार नाही असा निकाल 16 जानेवारीला राहुल नार्वेकर यांनी दिला.
6 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिलं.
हेही वाचा – विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी केली विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी
लोकसभा निवडणूक
16 मार्चला 18 व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 एप्रिल रोजी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला.
मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान पाच टप्प्यांत पार पडले.
4 जूनला निवडणुकीचा निकाल लागला. त्यात महाविकास आघाडीच्या 29 तर महायुतीच्या 19 जागा निवडून आल्या.
विधानसभा निवडणूक
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची 29 जूनला घोषणा झाली.
संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी एकत्र येत ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाची तिसरी आघाडी सप्टेंबरमध्ये स्थापन केली.
निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक जाहीर केली.
राज्यात 20 नोव्हेंबरला 65.11% मतदान झाले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. महायुतीच्या 237, महाविकास आघाडीच्या 49 तर अपक्ष 2 जागा निवडून आल्या.
राज्यात महायुतीचे सरकार आले आणि 6 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी 6 डिसेंबरला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
15 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11, राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.




