ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड, भाव काय?

जितकी किंमत वधारली. तितकाच भाव कमी

महाराष्ट्र : गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड झाली. या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात सोने 600 रुपयांनी महागले तर चांदी 1100 रुपयांनी महागली. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही धातुला सूर गवसला नाही. जितकी किंमत वधारली. तितकाच भाव कमी झाला. या आठवड्यात दोन्ही धातुत मोठा उलटफेर झाला नाही.

सोने 600 रुपयांनी वधारले
या आठवड्यात सुरुवातीला सोने सुस्तावले. तर 25 डिसेंबर रोजी 100 रुपये, 26 डिसेंबर रोजी 280 रुपये, तर 27 डिसेंबर रोजी 270 रुपये असे एकूण 600 रुपयांहून अधिकने सोने महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मागील आठवड्यात चांदी 6,500 रुपयांनी वधारली तर 5 हजारांनी स्वस्त झाली होती. या आठवड्यात या धातुत पडझडीचे सत्र दिसले. 23 डिसेंबर रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त तर 25 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी वधारली. 26 डिसेंबर रोजी त्यात 1 हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 76,436, 23 कॅरेट 76,130, 22 कॅरेट सोने 70,015 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,327 रुपये, 14 कॅरेट सोने 44,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,831 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button