Uncategorized

‘रोहयो’च्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी अमोल पवार यांची निवड

सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात बैठक

पुणे | रोजगार हमी योजनेच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेच्या पश्चिम विभागीय अध्यक्षपदी अमोल अरुण पवार यांची एकमताने निवड झाली. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची पुणे येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत इस्लामपूर येथील पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार यांची पुणे विभागीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

राज्य अध्यक्ष रोहन पवार, सचिव बाळासाहेब गायकवाड व राज्यातील सर्व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. या निवडीनिमित्त त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल त्यांचा पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button