ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नक्षत्र परिवर्तनाचा लाभ तीन राशींना नव्या वर्षात मिळणार

शनीला न्यायाची देवता तसेच कर्मफल दाता देखील म्हटलं जातं

महाराष्ट्र : शनीला न्यायाची देवता तसेच कर्मफल दाता देखील म्हटलं जातं. शनी पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये 27 डिसेंबरला प्रवेश करणार आहे. या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ हा तीन राशींना नव्या वर्षात मिळणार आहे. जाणून घेऊयात त्या राशींबद्दल

मेष रास – या राशींचे लोक जर नोकरी करत असतील तर नव्या वर्षांमध्ये त्यांच्या प्रमोशनाचा योग बनत आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कार्याचं कौतुक होईल. प्रगतीचे नवे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. या काळात कुटुंबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं मोठं काम या काळात होऊ शकतं.

तुळ रास – शनीचं नक्षत्र परिवर्तन या राशींच्या लोकांसाठी खूपच शुभकारी असणार आहे. तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. उत्पन्नाचं एखादं नवं साधन तुम्हाला नव्या वर्षात मिळू शकतं. तसेच या राशींच्या विद्यार्थ्यांसाठी देखील नवं वर्ष हे खूप काही देऊन जाणारं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीचा योग आहे.

कुंभ रास – कुंभ राशीला देखील शनीच्या परिवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे. तुम्ही जर कुठे गुंतवणूक केलेली असेल तर तिच्यापासून तुम्हाला या काळात मोठा फायदा मिळू शकतो. नोकरीमध्ये देखील प्रमोशनचा योग आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group