पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच, शिवाजीनगरमधील हॉस्पिटलजवळ भीषण आग!

पुणे : आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. पुण्यात शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आगीची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ एका बंद घरामध्ये आग लागली आहे. या बंद असलेल्या घरात अचानक आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून ३ वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. शर्तीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली आहे. यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या वेळीच आल्या आहे. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा – ‘शरद पवार आणि अजित यांनी एकत्र यायला पाहिजे’; सुनंदा पवार यांचं मोठं विधान
बंद घरात आग नेमकी कशी लागली? की कुणी लावली? असं प्रश्न आता विचारले जात आहेत. आग लागताच घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तसेच आग लागली की लावली याचा तपास पोलीस करत आहेत.




