Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवार यांच्या घरी काय चर्चा? अजित पवार म्हणाले..

नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित होते.

या भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस, उद्या काकीचा वाढदिवस आहे त्यामुळे या दोघांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो. दर्शन घेतले, चहापाणी झालं. त्यासोबत इतर गोष्टींवर चर्चा झाली. परभणीला असं का घडलं अशा इतर बाबींवर बोललो. संसदेचे कामकाज, मंत्रिमंडळ विस्तार, अधिवेशन याबाबतही चर्चा झाली. राजकीय चर्चा होत असतात. आज १२ डिसेंबरला साहेबांचा वाढदिवस आहे, त्यासाठी सगळे जण त्यांना भेटून शुभेच्छा देतात, आशीर्वाद घेतात. आम्हीही त्यासाठी आलो आहे असं त्यांनी सांगितले.

हेही वाचा    –        भारतीय रेल्वेचे खाजगीकरण होणार नाही: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

त्याशिवाय महाराष्ट्रात आम्ही तिघांनी शपथ घेतली आहे. बाकीचे मंत्रिमंडळ कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. १६ तारखेपासून अधिवेशन आहे. अधिवेशनात विधेयके आहेत इतर कामकाज आहे. विभागाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्र्‍यांची गरज असते. बहुतेक १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मी घरातलाच आहे. राजकारणात टीकाटिप्पणी होते पण काही वेगळे संबंधही असतात. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचे हे शिकवले आहे. त्यापद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांच्या भेटीवर सूचक विधान केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button