ताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

पुष्पा 2 च्या प्रीमिअरदरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन महिलेचा मृत्यू

‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट 3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर थिएटरमध्ये

हैदराबाद : फायनली…. 3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट थिएटरमध्ये आला आहे. अल्लू अर्जुनच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसत आहे. या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात अडव्हान्स बूकिंगही झालं असून हा चित्रपचट अनेक रेकॉर्ड्स मोडण्याच्या तयारीत आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अत्यंत आतूर आहेत. मात्र याच चित्रपटाच्या प्रीमिअर शो दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका थिएटरमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर यामध्ये आणखी एक व्यक्ती देखील जखमी झाली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणच्या हैदराबादमध्ये हा अपघात झाला. तेथील संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन महिलेचा मृत्यू झाला. रेवती असे तिचे नाव आहे. तर या घटनेत एक 9 वर्षांचा बालकही जखमी झाला असून तो मृत महिलेचा मुलगा असल्याचे समजते. चित्रपटगृहात प्रेक्षकांची संख्या मर्यादाबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत आई आणि मुलगा बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला, तर जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

रिपोर्टनुसार, या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा प्रीमिअर शो होता. मात्र थिएटरमध्ये निर्धापित मर्यादेपेक्षा जास्त लोक पोहोचल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. थिएटरमध्ये सुमारे 200 पोलिस तैनात होते. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group