ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटांच्या चर्चांवर अभिषेकचा खुलासा

ऐश्वर्या राय सोबत घटस्फोटांच्या चर्चांवर अभिषेकचा खुलासा

मुंबई : अनेक महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक वर्ष एकत्र संसार केल्यानंतर ऐश्वर्या – अभिषेक आता विभक्त होतील का? असा प्रश्न चाहते सतत विचारत आहेत. पण घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनी देखील आतापर्यंत मौन बाळगलं आहे. पण अभिषेक याने ‘आय वॉन्ट टू टॉक’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रंगणाऱ्या चर्चांमुळे झालेल्या समस्यांबाबत मोठा खुलासा केला आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला. आयुष्यात कितीही अडचणी आल्यातरी व्यक्तीसा आशेच्या किरणाचा शोध घ्यायला हवा सध्या अभिनेता आयुष्यात सुरु असलेल्या नकारात्मक गोष्टींचा सामना करत आहे. अभिषेक म्हणाला, हिंदीमध्ये एक शब्द आहे ‘दृढता’ कुठे न कुठे एक व्यक्तीच्या रुपात तुम्ही कोण आहात हे कधीही बदलू नये. स्वतःचे मूलतत्त्व कधीही बदलू नये.

पुढे अभिषेक म्हणाला, जर वाईट वाईटाला सोडत नाही तर, आपण आपला चांगूलपणा का सोडवा? मी जे काही आहे त्याला बदलू शकत नाही. मी एक सकारात्मक व्यक्ती आहे. नकारात्मक गो।ष्टींवर मी लक्ष देत नही. जर तुम्ही नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देता तेव्हा त्याच नकारात्मक गोष्टी तुमच्यावर वरचढ ठरतात, असं देखील अभिनेता म्हणाला.

कठीण काळात तर तुम्हाला आशेचं किरण दिसत असेल, तर त्याला पकडून ठेवा कारण त्यामुळेच तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळेल आजकाल लोकांसाठी अंधारात आणि नकारात्मकतेत हरवून जाणे खूप सोपे आहे अडथळे काहीही असोत, तुमचा आशेचा किरण शोधा, असं देखील अभिषेक बच्चन म्हणाला.

ऐश्वर्या राय –अभिषेक बच्चन लग्न
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी आराध्या देखील आहे. आराध्या हिला कायम आई ऐश्वर्या हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक दोघींसोबत दिसत नसल्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *