अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया...

छत्रपती संभाजीनगरः
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचा विजय झाला. यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे. यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावं तर मोठ- मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावं. हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला… जेवढे लोक निवडून आलेत ना… त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे. एखादिया आमदाराने म्हणावं की तो मराठ्यांच्या जीवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची सगळी हयात जाईल. तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या कशाला नादी लागता. मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळं बोलत बसतेत. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतेत. अरे पण आम्ही मैदानातच नाही, असं जरांगे म्हणालेत.





