Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘अजित पवार यांनाही आम्ही भगवे करू’; देवेंद्र फडणवीस यांचं विधान

Devendra Fadnavis | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला आहे. मात्र महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनी या घोषणेचा विरोध केला आहे. हा महाराष्ट्र आहे, इथे कटेंगे, बटेंगे चालत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की अजित पवार हे पलीकडून आमच्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या गोष्टी लक्षात येत नसतील. त्यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ हा नारा ठिक नसल्याचं म्हटलं असलं तरी त्यांनी ‘एक है तो सेफ है’ हा नारा ठिक असल्याचं म्हटलं आहे. याचा अर्थ ग्लास अर्धा रिकामा आहे. अजित पवारांना सुचवायचे आहे की, ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणून नका, ग्लास अर्धा भरलेला आहे म्हणा. आम्हाला त्यांची भूमिका मान्य आहे.

हेही वाचा     –        मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी!

आमची संपूर्ण विचारसरणी जुळली असती तर त्यांचा वेगळा पक्ष कसा राहिला असता. आम्ही आधीच जाहीर केले आहे की, आमची आणि त्यांची राजकीय युती आहे. ते आमता आमच्या बरोबर आले आहेत, हळूहळू तेही आमच्या विचारात रंगतील. अजित पवार यांनाही आम्ही भगवे करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार अशोक चव्हाण यांनीही बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर नापसंती व्यक्त केली आहे. याबाबत विचारलं असता. देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांनाही बहुतेक हे समजलेले नाही. त्यांनी या घोषणेचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. सर्वांना ही गोष्ट समजेलच असे नाही. त्यांना आम्ही समजावून सांगू.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button