पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदीप्रदूषण या समस्या प्राधान्याने मार्गी लावणार : शंकर जगताप
चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचे जंगी स्वागत

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण या प्रमुख समस्या आहेत. आणि या समस्या सोडविण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने पावले उचलली आहेत. पवना नदीसह भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाण्याची उपलब्धता असेल, मेट्रो-रिंगरोडच्या माध्यमातून वाढणारी वाहतूक कनेक्टिव्हिटी असेल किंवा नदीसुधार प्रकल्पाच्या असेल या माध्यमातून शहरातील या महत्वाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारने पाऊले उचलली आहेत. या कामांना वेग मिळाल्यास पुढील काही काळात चिंचवड मतदारसंघातील हे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे महायुती सरकारच्या हातात बळकटी देण्यासाठी चिंचवडवासीयांनी या निवडणुकीत मला साथ द्यावी; असे आवाहन महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी यावेळी केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार जगताप शंकर पांडुरंग यांच्या प्रचारार्थ चिंचवडगाव येथे झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला. या प्रचार दौऱ्यात चिंचवडकरांनी शंकर जगताप यांची घोडागाडीतून जंगी मिरवणूक काढत जोतदार स्वागत केले.

हेही वाचा – आम्ही बेघर असलो, तरी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार!
यावेळी चिंचवडगावातील नवतरुण मित्र मंडळ, पडवळ आळी, इंदिरा पार्क, गोखले वृंदावन, शांतीबन, काकडे कॉर्नर, दत्त मंदिर, सोनीगरा निलय, रिव्हर रोड, रॉयल क्लासिक, सिल्वर गार्डन, वेताळ नगर, पवनानगर, रस्टन कॉलनी, भोई आळी, मेट्रो पॉलिटेन, सावित्रीबाई फुले उद्यान, हिररांजा, आनंदी बाई डोके उद्यान, काकडे टाऊनशिप मधील सर्व इमारती तसेच सोनिगरा टाऊनशिप, श्यामा हेरिटेज, ओरिएंटल, गोयल गरिमा, मोरया राज पार्क, कीन्स्टाऊन सोसायटी, शेजल पार्क, ग्लोसम निंबाळकर हाईट्स या परिसरातील नागरिकांना आणि सदनिकाधारकांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी चिंचवड गावातील माळी आळी, गांधी पेठ येथील ज्ञानदीप मित्र मंडळ, जुना जकात नाका येथील राणा प्रताप मित्र मंडळ, तालेरा नगर येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, भोई आळी येथील उत्कृष्ट तरुण मंडळ, भाजी मंडई जवळील नवतरुण मंडळ, चिंचवडचा राजा चौक येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, चिंचवड गावठाण येथील श्री. काळभैरवनाथ मित्र मंडळ, पावर हाऊस चौक येथील नव गजानन मित्र मंडळ, श्रीराम मंदिराजवळील क्रांतिकारक भगतसिंग मित्र मंडळ, गांधी पेठ येथील मंगलमूर्ती वाड्याजवळील श्री मयुरेश्वर मित्र मंडळ, गणेश पेठ येथील अष्टविनायक मित्र मंडळ यांसह विविध सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी शंकर जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना जाहीर पाठींब्याचे पत्र दिले आहे.
स्व. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी कायम विकासाचे राजकारण केले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांनी मतरुपी जो विश्वास आपल्यावर दाखविला आहे, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी झटले पाहिजे ही लक्ष्मणभाऊंची आम्हाला शिकवण आहे. त्यांची हीच शिकवण आचरणात आणून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जे महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी मी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या समस्या सोडविणार, असा विश्वास मी तुम्हाला देतो.
– शंकर जगताप, महायुतीचे उमेदवार.





