Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मार्केट यार्ड भागातील वाहतूक कोंडी सोडविणार’; माधुरी मिसाळ

पुणे : बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात वाहतूक प्रकल्पाला मंजुरी दिली असल्याची माहिती भाजप महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.

माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ प्रेमनगर, आंबेडकरनगर परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेविका मानसी देशपांडे, अनुसया चव्हाण, मनोज देशपांडे, प्रीतम नागपुरे, आशा बिबवे, विजय आल्हाट, बसू गायकवाड, सुनीता मोरे, संजय गावडे, शिवम देशपांडे, ज्ञानेश्वर मानकर, शकील शेख, प्रसाद देशपांडे, उषा साळवे, तुकाराम खंडागळे, ब्रम्हा मिसाळ, चेतन क्षीरसागर, आप्पा गाढवे, नवनाथ वांजळे, गायत्री कांबळे यांचा प्रमुख सहभाग होता.

हेही वाचा       –        महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी ‘सायकल व बाईक रॅली’

माधुरी मिसाळ म्हणाल्या, मार्केट यार्डमध्ये येणार्‍या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ती सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि कात्रजहून बिबवेवाडीकडे जाण्यासाठी स्वतंत्र 24 मीटर रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पाला 93 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. तर पर्वती मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांवर अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एटीएमस ही अत्याधुनिक, स्वयंचलित वाहतूक सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहतुकीची गती वाढवून नागरिकांचा वेळ वाचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group