‘गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय’; उद्धव ठाकरेंची शहाजी बापू पाटलांवर टीका

‘गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय’; उद्धव ठाकरेंची शहाजी बापू पाटलांवर टीका

Uddhav Thackeray | सांगोल्यात शिवसेनेची (उद्धव ठाकरे) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदार शाहीजीबापू पाटील यांच्यासह शिंदे गट तसेच अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना रायगडावरील टकमक टोक दाखवायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की मी गद्दारांच्या छाताड्यांवर पुन्हा भगवा गाडायला आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. मला गद्दारांना सांगायचं की त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचं टकमक टोक बघितलं नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचं आहे. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी मला २३ तारखेचं गुवाहाटीचं तिकीट काढून द्यावं, कारण एकाला तिकडे पाठवायचं आहे. मग त्यांनी तिथे झाडं मोजत बसावं.

हेही वाचा    –      ‘धर्म धोक्यात आहे म्हणणाऱ्यांचा पक्ष धोक्यात’; भावाची सभा रितेश देशमुखांनी गाजवली

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह आज महाराष्ट्रात फिरत आहेत. लगे रहो मुन्नाभाईमधील सर्कीटसारखी त्यांनी अवस्था आहे. इथे येऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील कलम ३७० बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना, आम्ही कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर आहोत, असे ते म्हणतात, पण कदाचित अमित शाह यांना स्मृतीभ्रंष झाला असावा, कारण ज्यावेळी कलम ३७० रद्द झालं, त्या निर्णयाला आम्हीसुद्धा समर्थन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील ३७० रद्द केल्याचं आणि राम मंदिर बांधल्याचं सांगत आहेत. राज्यातल्या मुलभूत प्रश्नांवर भाजपा बोलत नाही. आज महायुतीकडून मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्या महाराष्ट्रातील इतर शहरातील सात बाराही अदाणींच्या नावे होऊ शकतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *