Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

चिंचवडमधून नाना काटे यांची तलवार म्यान, महायुतीचे पारडे जड!

विधानसभा निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मनधरणी

पिंपरी | अजितदादांच्या मनधरणीनंतरही लढणारच असा शड्डू ठोकलेले युतीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे एक मातब्बर बंडखोर उमेदवार नाना काटे यांनी अखेर थोड्या वेळापूर्वी माघार घेतली.आज माघारीची मुदत संपण्यापूर्वीच त्यांनी आपली तलवार म्यान केल्याने तेथील युतीचे (भाजप) उमेदवार शंकर जगताप यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ते स्वत दीड तास काटेंकडे आज माघारीसाठी बसून होते.त्यात अजितदादांचा सकाळी फोन आल्याने काटेंनी अखेर माघार घेतली आहे.

गेल्यावर्षी झालेल्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीत त्यांनी लाखभर मते घेतली होती.त्यामुळे ते पुन्हा यावेळी इच्छूक होते. मात्र, जागावाटपात ही जागा विद्यमान आमदार असलेल्या भाजपकडे गेल्याने काटेंनी बंडाचा झेंडा फडकावला होता.मात्र, अजितदादांसह भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विनंती केल्याने माघार घेतल्याने काटेंनी सांगितले.मात्र,ते नाराज दिसत होते.शहराच्या भल्यासाठी अजितदादांचा आदेश मानून माघार घेत असून युतीचा धर्म पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा    –        ‘बहिणींच्या उच्च शिक्षण, नोकरीतील अडसर दूर करणार’; शंकर जगताप

चिंचवडमधून नाना काटे यांची तलवार म्यान, महायुतीचे पारडे जड!

मावळमध्ये आघाडीधर्म पाळणार..

मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आणि आमदार सुनील शेळके यांच्याविरुद्ध तेथे भाजपने केलेले बंड मागे घेण्याच्या अटीवर आपली माघार असल्याचे फडणवीसांना फोनवर सांगितले. त्यावर मावळातही आम्ही महायुतीचा धर्म पाळू,तुम्ही निश्चिंत रहा,असे आश्वासन फडणवीसांनी दिल्याचे काटे यांनी सांगितले. त्यामुळे मावळातील भाजपचे बंड शमणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button