Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुढील ३ दिवस धोक्याचे! हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather | हवामान विभागाने पावसासंर्भात महत्वाची अपडेट्स दिली आहे. महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या व मध्यम सरीचा पाऊस कोसळेल. २२ ऑक्टोबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणार आहे. त्यानंतर २३ ऑक्टोबरला राज्यातील मराठवाडा विभागातील मान्सून माघारी फिरणार आहे आणि २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा दावा हवामान तज्ज्ञ करत आहेत. याशिवाय, येत्या ५ नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा    –      आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या ४८ तासात सार्वजनिक मालमत्तेवरील २५ हजाराहून अधिक प्रचारसाहित्य हटविले; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

या जिल्ह्यांना यलो अलर्ट :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या ५ नोव्हेंबरपासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button