Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाराष्ट्रातही विजयाची पुनरावृत्ती होणार’; आमदार महेश लांडगे

पिंपरी : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाची ‘हॅट्रिक’ केली आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही विजयाची पुनरावृत्ती होणार असल्याचा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले. एक्झीट पोलचे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपा परिवाराने विजयाची ‘हॅट्रिक’ केली आहे. हरियाणाच्या सूज्ञ जनतेचे मी आभार मानतो. विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा हा विजय आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अशीच विजयाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास आहे.

हेही वाचा     –        चिखली घरकुलच्या प्रलंबित प्रश्नांना अखेर मिळाला न्याय! 

काँग्रेस काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचे राज्य होते. काश्मीर खोऱ्यात आता लोकशाही पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. दहशतीशिवाय लोकांनी आपले प्रतिनिधी निवडले आहेत. या अभूतपूर्व बदलांसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे आमदार महेश लांडगे यांनी अभिनंदन केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button