क्रिडाताज्या घडामोडीपुणे

पुणे जिल्हा शालेय जिल्हास्तरीय रोलबाॅल स्पर्धेत विद्या निकेतन स्कूलची लक्षवेधी कामगिरी…

रोलबाॅल खेळामध्ये 14 वर्षाखालील वयोगट मुलांच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला

पुणे : दिनांक ७ ऑक्टोंबर २०२४ रोजी पुणे रोलबॉल मैदान येथे झालेल्या पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५. या स्पर्धेमध्ये श्री.एस. पी. देशमुख शिक्षण संस्था संचलित विद्या निकेतन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व त्यामध्ये विद्यार्थ्यांनी लक्षवेधी कामगिरी केली. या रोलबाॅल खेळामध्ये 14 वर्षाखालील वयोगट मुलांच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला.

या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच 14 वर्षे खालील वयोगट मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. सर्वात मोठी अभिमानाची बाब म्हणजे या शाळेतील खेळाडूंनी या क्रीडा प्रकारात पहिल्यांदा सहभाग घेऊन मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक तर मुलीच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे. पुढील सामना क्षेत्रीय स्तरावर होत असताना 14 वर्षाखालील मुलांची टीम तसेच ठराविक मुलींची निवड झाली.

या स्पर्धेला उपस्थित पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे , खेड तालुका क्रीडा समिती चे अध्यक्ष नितीन वरकड , पुणे जिल्हा रोलबॉल संघटना यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शामराव देशमुख , संस्थेच्या सचिव. रोहिणी ताई देशमुख तसेच शाळेचे प्राचार्य दिपक शिंदे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक अक्षयकुमार शिंदे व गिरीश खुरपे यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button