‘अमित शाह यांनी महाराष्ट्राला आणि शिवसेनेला दिला धोका’; संजय राऊतांचे विधान
महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत हिशोब चुकता केला,शिंदे हे लाचार आहेत. स्वाभिमान शून्य

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर बोलताना नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक हरतील. त्या दिवशी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून उतरवण्याची क्रिया प्रक्रिया सुरु झालेली असेल, असं संजय राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाचार आहेत. स्वाभिमान शून्य आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
अमित शाह यांच्यावर निशाणा
धोका कुणी कुणाला दिलाय हे महाराष्ट्र जाणतो. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वत: अमित शाह यांनी महाराष्ट्राला आणि शिवसेनेला धोका दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जी चर्चा झाली. जे शब्द दिले घेतले. त्याबाबत धोकेबाजी ही अमित शाह यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत हिशोब चुकता केला. त्यामुळे राज्यातील जनता कुणावर विश्वास ठेवते हे नव्याने सांगायला नको, असं संजय राऊत म्हणाले.




